मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान उत्सवात ६५ वैज्ञानिक प्रतिकृतीतींचे सादरीकरण…

⚡मालवण ता.२८-:
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये विज्ञान उत्सव साजरा करण्यात आला. या विज्ञान उत्सवामध्ये प्रशालेतील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या ६५ वैज्ञानिक प्रतिकृतीतींचे सादरीकरण करण्यात आले .

यावेळी प्रशालेचे कलाशिक्षक श्री. बांदेकर यांनी रेखाटलेल्या भारताचे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ प्रा.सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक हणमंत तिवले व पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विज्ञान शिक्षक श्री. एस. डी. अवसरे, सौ. जे. व्ही. रेवणकर, श्रीमती पी. जी. मेस्त्री आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पी. जी. मेस्त्री यांनी केले.

यावेळी श्री. अवसरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विषद करून वैज्ञानिक गोष्टीसांगितल्या. तर नोबेल पारितोषिक विषयी श्री. बनसोडे यांनी माहिती सागितली.
मुख्याध्यापक श्री. तिवले सर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन पी. जी. मेस्त्री यांनी केले तर आभार सौ. रेवणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कलाशिक्षक श्री. बांदेकर व कुडाळकर मॅडम यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page