वैज्ञानिक दुष्टिकोनातूनच आधुनिकतेची कास धरूया…

श्री अजयराज वराडकर:कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे विज्ञान दिन साजरा..

⚡मालवण ता.२८-:
आजचा समाज सुसंकृत आहे सामजिक भान असलेला आहे तसाच तो आधुनिक आहे. अश्या सर्व संपन्न बाबी असूनही आज सामजिक समस्या निर्माण होत आहेत या चिंताजनक बाबी असून फक्त आपण आधुनिक होत चाललो आहोत .पण फक्त आधुनिक म्हणून चालणार नाही यासाठी आपणाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल किंबहुना आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधुनिकतेची कास धरावी लागेल असे प्रतिपादन कट्टा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी येथे बोलताना केले

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला प्रारंभी सी व्ही डॉ. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष श्री वराडकर तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी प्रशालेतील विज्ञान विभागामार्फत घेतलेल्या उपक्रमातील व तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करण्यात येणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

प्रशाळेचे पर्यवेक्षक आणि विज्ञान विभाग प्रमुख श्री.महेश भाट यांनी विज्ञान दिनानिमित कार्यक्रमात विज्ञान विभागामार्फत चाललेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली .या वेळी सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page