बांद्यात ९ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२८-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ (गोवा), हिंदू एकता मंच, बांदा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ९ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक येथील विठ्ठल मंदिर व्यापारी भुवनात सकाळी १० ते ४ दरम्यान शिबीर सुरू राहणार असल्याची माहिती शिबीर प्रमुख नीलेश सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरात हृदयरोग, उच्चरक्तदाब, अलर्जी व दमा, श्वसन विकार, पक्षाघात, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, वातविकार, मधुमेह, बालरोग, मुळव्याध, पचन, कान – नाक – घसा, स्त्रीरोग, थायरॉईड, गुप्तरोग व अन्य जुनाट विकार यावर उपचार होणार आहेत. यात तज्ञ डॉक्टरांचा समावेश असणार आहे. शिवाय प्रकृतीप्रमाणे आहार, विहार व योग संदर्भात माहिती देखील देण्यात येणार आहे. शिबीरात सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी होणार असून सदर शिबीर पूर्णपणे मोफत आहे. यात तपासणी व औषधे ही देखील पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत.
तसेच ज्यांना पूर्वीच एखाद्या रोगाची अथवा व्याधीची कल्पना असल्यास किंवा मुख्य शिबिरातील वैद्यकीय तपासणी करता आवश्यक असलेली वरील सर्व रोगांवरील रक्ताची तपासणी मातृत्व मेडिकल स्टोअर्स येथे मंगळवार ४ (बांदा शहर) व ५ मार्च (बांदा दशक्रोशीतील इतर गावे) रोजी सकाळी १० ते २ यावेळेत होणार आहे. मुख्य आरोग्य शिबीरापूर्वी रुग्णांनी आपली वरील सर्व रोगांवरील रक्त तपासणी सदर शिबीरात मोफत करून घ्यायची आहे. त्यात हीमोग्लोबीन, लाल पेशी-पाढऱ्या पेशी, प्लेटलेटस, सर्व कोलेस्टॉल टेस्ट), किडणी फन्शन टेस्ट, लिवर फन्शन टेस्ट व इतर आवश्यक सर्व रक्त तपासण्या मोफत केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, हिंदू एकता मंच बांदाचे गुरु कल्याणकर, बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, संदेश पावसकर, हेमंत दाभोलकर, जय पटेकर, सौरभ आगलावे, साईराज पावसकर, केदार कणबर्गी आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा व्यापारी भुवन येथे पत्रकार परिषदेत आरोग्य शिबिराची माहिती देताना नीलेश सावंत, गुरु कल्याणकर, मंगेश पाटील व अन्य.

You cannot copy content of this page