⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व वेंगुर्ला बाजारपेठमधील भाजी विक्रेता अतुल सुनील केरकर (२५) याचा २७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल केरकर हा युवक वेंगुर्ला बाजारपेठ येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. २७ फेब्रुवारी रोजी अतुल भाजी विक्रीच्या ठिकाणी अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याला आजूबाजूच्या व्यवसायिकांनी उपचाराकरिता वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले तेथे उपचारादरम्यान वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मृत घोषित केले. काही दिवस अगोदर त्याच्या छातीत दुखत असल्याने त्यावर उपचार सुरू होते. मात्र अतुलचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबाला जोरदार धक्का बसला आहे. या घटनेबाबत वेंगुर्ला शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे.
फोटो – अतुल केरकर
वेंगुर्ल्यात २५ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू…
