Headlines

काळसे बागवाडी येथे आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम…

ग्रामस्थांना केले प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन.. ⚡मालवण ता.२८-:जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील कर्ली नदीकिनारी असलेल्या आणि पुरस्थितीसाठी संवेदनशील असलेल्या काळसे बागवाडी येथे मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस, तसेच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी व बागवाडी ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी आपत्कालीन स्थितीतील बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिकासह…

Read More

मालवण बंदर जेटी रस्त्याच्या कामात मेरीटाईम बोर्डाकडून कोट्यावधी निधीचा चुराडा…

मनसेच्या गणेश वाईरकर यांचा आरोप.. ⚡मालवण ता.२८-:मालवण बंदर जेटी येथे काँक्रीटचा रस्ता बनविण्यासाठी शासनाने सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार सूचना देऊन सुद्धा सदर विभागाने ठेकेदाराला पाठीशी घालत मनसेच्या सूचनेकडे दुर्लक्ष…

Read More

शिवाजी वाचन मंदिरतर्फे संस्कार वर्ग संपन्न…

⚡मालवण ता.२८-:मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर तर्फे मुलांसाठी पाच दिवसांचा संस्कार वर्ग संपन्न झाला. या संस्कार वर्गास उत्तम प्रतिसाद लाभून ६ ते १२ वयोगटातील मुलांनी यामध्ये सहभाग घेतला. या शिबिरात मुलांना प्रार्थना, योगा, गाणी, गोष्टी, खेळ, ओरिगामी शिकविण्यात आले. प्रथमोपचार कसे करावेत, पाण्याचे महत्व, वृक्षतोड व प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामाला मानव कसा जबाबदार आहे,…

Read More

ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यानंतर सा. बां. विभागाकडून चौके येथे गटार खोदाई…

⚡मालवण ता.२८-:चौके- कुडाळ रस्त्याकडील बाजारपेठेनजीक गटार खोदाई न केल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत असल्याने याबाबत चौके ग्रामपंचायतीने लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर गटार खोदाई करण्यात आली. चौके- कुडाळ रस्त्याकडील बाजारपेठेनजीक गटार खोदाई न केल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत होते. यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत चौके ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण…

Read More

अविश्वास प्रस्ताव दाखल झालेले देवली सरपंच श्याम वाक्कर यांना ग्रामस्थांनी तारले…

मतदानामध्ये वाक्कर १२ मतांनी विजयी.. ⚡मालवण ता.२८-:मालवण तालुक्यातील देवली गावचे सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या मतदानात वाक्कर यांचा विजय झाला. लोकनियुक्त सरपंच म्हणून वाक्कर कार्यरत असल्याने त्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मान्यतेसाठी ग्रामसभेची मान्यता असणे आवश्यक होते, यामुळे मतदान घेण्यात आले. गुप्त पद्धतीने झालेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान कडक…

Read More

वरवडे मार्गावरून होणारी ओव्हरलोड चिरे, वाळू वाहतूक थांबवा

ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी.. कणकवली : कणकवली – आचरा मार्ग बंद झाल्याने सध्या पर्यायी मार्ग म्हणून वरवडे गावातून वाहतूक सुरू आहे. मात्र, ही वाहतूक होत असताना चिरे, वाळूची ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे वरवडेतील रस्त्याच्या मोऱ्या व साइडपट्ट्या खचल्या आहेत. यामुळे पुलावरून वाहतूक सुरू होईपर्यंत चिरे, वाळूची वाहतूक या मार्गात बंद करून पर्यायी मार्गाने…

Read More

फार्मसी प्रवेश प्रक्रियेवर ३१ मे रोजी मोफत मार्गदर्शन सत्र…

भोसले फार्मसी कॉलेजचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२८-: यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या वतीने शनिवार, दि.३१ मे रोजी सकाळी १० वाजता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रमावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, आवश्यक कागदपत्रे, शासकीय शिष्यवृत्ती तसेच…

Read More

श्री देव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यास २ जूनपासून सुरुवात…

२ ते ५ जून कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम* सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील श्री देव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळा सोमवार २ जून ते गुरुवार ५ जून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर २८ मे ते ७ जून या कालावधीत मळगावमध्ये मच्छी विक्रेत्यांनी मच्छी विक्री व…

Read More

पावसामुळे शहराची अवस्था बिकट असताना आता तरी दीपक केसरकर सावंतवाडीत या…

आशिष सुभेदार:एरव्ही प्रत्येक मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे संजू परब गप्प का..? सावंतवाडी: मान्सूनपूर्व पावसाने सावंतवाडी शहरात गेल्या आठवडाभरापासून वीजेचा खेळखंडोबा सुरू असून नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे आशिष सुभेदार यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “आमदार दीपक केसरकर आता तरी मतदारसंघात या,” अशी हाक सुभेदार यांनी त्यांना दिली आहे….

Read More

आंबोली तलाठी सुमित घाडीगावकर यांची बदली रद्द करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

आंबोली,ता.२८: येथील तलाठी सुमित घाडीगावकर यांची बदली रद्द करावी अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आंबोली सज्जाचे तलाठी सुमित घाडीगावकर हे प्रामाणिक आणि हुशार तसेच स्वच्छ चारित्र्याचे महसूल कर्मचारी आहेत. आंबोलीच्या इतिहासात आतापर्यंत स्वच्छ चारित्र्याचा तलाठी श्री घाडीगावकर हे प्रथमच ठरले आहेत. कोणत्याही दाखल्यासाठी उत्पन्न दाखल्यासाठी त्यांनी कोणाकडून कोणतीही फी घेतली नाही.इतक्या वर्षात…

Read More
You cannot copy content of this page