ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यानंतर सा. बां. विभागाकडून चौके येथे गटार खोदाई…

⚡मालवण ता.२८-:
चौके- कुडाळ रस्त्याकडील बाजारपेठेनजीक गटार खोदाई न केल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत असल्याने याबाबत चौके ग्रामपंचायतीने लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर गटार खोदाई करण्यात आली.

चौके- कुडाळ रस्त्याकडील बाजारपेठेनजीक गटार खोदाई न केल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत होते. यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत चौके ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाला निवेदन देत गटार खोदाईची मागणी केली होती. चौके सरपंच श्री. पी. के. चौकेकर यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार पाठवून या रस्त्यावर गटार खोदाई करुन घेतली.

You cannot copy content of this page