⚡मालवण ता.२८-:
मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर तर्फे मुलांसाठी पाच दिवसांचा संस्कार वर्ग संपन्न झाला. या संस्कार वर्गास उत्तम प्रतिसाद लाभून ६ ते १२ वयोगटातील मुलांनी यामध्ये सहभाग घेतला.
या शिबिरात मुलांना प्रार्थना, योगा, गाणी, गोष्टी, खेळ, ओरिगामी शिकविण्यात आले. प्रथमोपचार कसे करावेत, पाण्याचे महत्व, वृक्षतोड व प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामाला मानव कसा जबाबदार आहे, हे गोष्टीतून मुलांना सांगितले. शिबिरातील सहभागी मुलांनी गाणी, गोष्टी व नाटुकल्यात सहभाग घेऊन आपली कला सादर केली.
शिबिराच्या प्रशिक्षक म्हणून संस्कृती बांदकर, श्रीधर काळे, डॉ. सुभाष दिघे, रत्नाकर कोळंबकर, लीना नार्वेकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी निकिता नाडकर्णी, वैदेही जुवाटकर, मानसी दूधवडकर, साक्षी सावंत उपस्थित होत्या. संस्कृती बांदकर यांना पुस्तक भेट देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
