आंबोली तलाठी सुमित घाडीगावकर यांची बदली रद्द करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

आंबोली,ता.२८: येथील तलाठी सुमित घाडीगावकर यांची बदली रद्द करावी अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आंबोली सज्जाचे तलाठी सुमित घाडीगावकर हे प्रामाणिक आणि हुशार तसेच स्वच्छ चारित्र्याचे महसूल कर्मचारी आहेत. आंबोलीच्या इतिहासात आतापर्यंत स्वच्छ चारित्र्याचा तलाठी श्री घाडीगावकर हे प्रथमच ठरले आहेत. कोणत्याही दाखल्यासाठी उत्पन्न दाखल्यासाठी त्यांनी कोणाकडून कोणतीही फी घेतली नाही.इतक्या वर्षात हे यांच्या कालावधीतच झाले. यापूर्वी आंबोली तलाठ्यांनी आर्थिक गैर व्यवहार करून मोठ्या प्रमाणात बोगस नोंदी घातल्या होत्या.रेकॉर्ड देखील व्यवस्थित नहोते.अनेक राजकीय व्यक्ती,धन दांडगे तसेच दलाल एजंट यांनी तलाठ्यांना हाताशी धरून जमिनींचे व्यवहार केले होते. त्यामुळे रेकॉर्डच महसूल चे व्यवस्थित नहोते. मोठे आर्थिक व्यवहार पार पडायचे. मात्र आंबोली मध्ये तीन साडेतीन वर्षांपूर्वी सुमित घाडीगावकर हे तलाठी आल्यापासून कोणताही बोगस व्यवहार बोगस नोंद त्यांनी घातली नाही.अनेक चुकीच्या गोष्टींना त्यांनी रोखले. महसूल विभागातील ५० वर्षापासून घोळ असलेल्या रेकॉर्ड मध्ये भेसळ केलेली त्यांनी व्यवस्थित केले. स्वच्छ चारित्र्यवान आणी जनतेशी शासनाची प्रामाणिक पणे सेवा दिल्यामुळे आंबोली ग्रामस्थांनी त्यांच्या बदलीला विरोध केला आहे. गेल्या वर्षीच्या आंबोली आंदोलनात त्यांनी महसूल विभागाची रोख ठोक भूमिका बजावली होती. घाडीगावकर हे मूळचे आरोंदा येथील तालुक्यातीलच असल्याने आंबोली च्या कार किर्दी मध्ये आतापर्यंत असे काम कोणत्याच कर्मचाऱ्याने केलेले नाही. त्यामुळे आंबोली ग्रामस्थांनी घाडीगावकर यांची बदली रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले आहे.यावर यशवंत (रुपाजी)गावडे,नारायण कोरगावकर,काशीराम राऊत,बबन गावडे,प्रसाद मेस्त्री,उदय आंबोलकर,प्रकाश गुरव तसेच ग्रामस्थांनी सह्या करून निवेदन दिले आहे.तसेच मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री पालकमंत्री यांच्याकडे देखील निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आंबोली येथे जमिनीचे वाटप होईपर्यंत आणखी 2 वर्षे याच तलाठ्यांना इथे ठेवण्याची मागणी निवेदनातून ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page