श्री देव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यास २ जूनपासून सुरुवात…

२ ते ५ जून कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम*

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील श्री देव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळा सोमवार २ जून ते गुरुवार ५ जून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर २८ मे ते ७ जून या कालावधीत मळगावमध्ये मच्छी विक्रेत्यांनी मच्छी विक्री व चिकन विक्रेत्यांनी चिकन विक्री बंद करावी, असे आवाहन मळगाव गावचे मानकरी, देवस्थान कमिटी व सोनुर्ली-मळगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार ०२ जून प्रायश्चित्त विधी

सकाळी देवाला नारळ ठेवणे, देवांची संमती घेणे, प्रायश्चित्त, केशवपन, पंचगव्य होम, १०.०० ते ०१.३० पंचगव्य प्राशन, प्रायश्चित्त विधान महाप्रसाद आणि सांगता आदी कार्यक्रम होणार आहेत.

मंगळवार ०३ जून रोजी तत्त्वोद्धार विधी

सकाळी पुण्याहवाचन, संभारदान, मधुपर्क, आचार्यादी ब्राह्मण वरण, स्थलशुद्धी, अज्ञोरहोम, देवांची महापूजा, तत्वचालन होम, तत्वोद्धार, पूर्णाहुती, महाप्रसाद आणि सांगता आदी कार्यक्रम होणार आहेत.

बुधवार ०४ जून रोजी श्री देव मायापूर्वचारी सपरिवार देवता अर्चाविधी

सकाळी स्थलशुद्धी, जलाधिवास, स्नानविधी, शय्याधिवास, पीठदेवता स्थापना, अग्निस्थापना, वास्तुयजन, ग्रहह्यजन, पर्याय होम, महाप्रसाद आणि सांगता आदी कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवार ०५ जून रोजी पुनः प्रतिष्ठापना सोहळा

सकाळी ७:०० ते ०१:३० स्थलशुद्धी, देव उठवणे, तत्वन्यासहोम, तत्वन्यास व प्राणप्रतिष्ठा, देवतांची महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प, गाऱ्हाणे (सामुहिक प्रार्थना), ब्राह्मण पूजन, महाप्रसाद आणि सांगता आदी कार्यक्रम होणार आहेत. या पवित्र धार्मिक आनंद महासोहळ्यात सर्व ग्रामस्थ, माहेरवाशिणी, देणगीदार, भाविक भक्तगणांनी सहभागी होऊन महासोहळ्याची शोभा वाढवून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव गावचे मानकरी, देवस्थान कमिटी आणि सोनुर्ली-मळगाव ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page