ग्रामस्थांना केले प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन..
⚡मालवण ता.२८-:
जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील कर्ली नदीकिनारी असलेल्या आणि पुरस्थितीसाठी संवेदनशील असलेल्या काळसे बागवाडी येथे मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस, तसेच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी व बागवाडी ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी आपत्कालीन स्थितीतील बचाव कार्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
अचानक पुरस्थिती निर्माण झाल्यास आपला, आपल्या जनावरांचा, ग्रामस्थांचा व इतरांचा बचाव कसा करायचा तसेच पुराच्या पाण्यात एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीचा बचाव कसा करावा, तातडीने प्राथमिक उपचार करून त्या व्यक्तीचा जीव कसा वाचवावा याचे सर्व बचाव यंत्रणा वापरून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन यावेळी ग्रामस्थाना करण्यात आले.
या आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीममध्ये मालवण तहसिलदार वर्षा झालटे, निवासी नायब तहसिलदार नागेश शिंदे, मंडळ अधिकारी दीपक शिंगरे, महसूल सहायक करण मांजरेकर, ग्राम महसूल अधिकारी पोपट गुरव, सुहास थोरात, समिरा सावंत, उषादेवी पाटील, आरोग्य विभागाचे मालवण ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भाकरे, डॉ. प्रदिप आगलावे, डॉ. प्रियांशी अग्रवाल, डॉ. अजिंक्य आपटे, डॉ. ओंकार चव्हाण, आरोग्य निरीक्षक व्ही. पी. सावंत, आर. बी. साखरे, डी. एच. मयेकर, समुदाय आरोग्य अधिकारी दिव्या शेवडे, आरोग्य सेविका गौरी कसालकर, सुविधा प्रभु, काळसे ग्रामपंचायत सरपंच विशाखा काळसेकर, सदस्य मोनिका म्हापणकर, ख़ुशी राऊळ, लक्ष्मण माडये, ग्रामसेवक पी. आर. निकम, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश काळसेकर, श्रीकृष्ण भाटकर, मालवण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा खोत आणि कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस प्रकाश मोरे, पंचायत समिती विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्नेहा लोखंडे, ग्रामस्थ राजाराम केळजी, शशिकांत कुडाळकर, सत्यवान कुडाळकर, महेश कोरगावकर, सर्वेश खोत, मदन खोत, यश खोत, तुकाराम केळजी, रामकृष्ण खोत, संजय पवार, मंदार, केळूसकर, वीणा कुडाळकर, ममता केळजी, संचिता केळजी, अतुल केळजी, पुंडलिक केळजी, रुचिर केळजी, रघुनाथ गवंडे, योगेश मेस्त्री, नुपूर तारी, सुरेश गवंडी, प्रथमेश आढाव, यतीन मेथर, वैभव खोत, विजय माडये, ओंकार काळसेकर, आणि इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.
