Headlines

सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी नवनाथ झोरे…

⚡मालवण ता.०२-:सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी नवनाथ लक्ष्मण झोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी नवनाथ झोरे यांना नियुक्तीपत्र यांना दिले आहे. धनगर समाज राजकीय दृष्ट्या सक्रिय आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सकल धनगर मल्हार सेना ही संस्था कार्यरत असून संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती…

Read More

वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी बांधावरची शेती उपक्रमातून घेतला शेती कामांचा अनुभव…

⚡मालवण ता.०२-:विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेतीबाबत आवड निर्माण व्हावी ,शेतीची प्राथमिक माहिती मिळावी या हेतूने कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण सेवा योजना माझी वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधून एक दिवस बळीराजासाठी अर्थात बांधावरची शेती हा उपक्रम राबविण्यात आला. कट्टा येथील प्रयोगशील शेतकरी सुधीर उर्फ बापू वराडकर यांच्या…

Read More

मळेवाड येथे दुचाकीवर झाड कोसळले…

अनर्थ टळला:एक जखमी… सावंतवाडी – आरोंदा मळेवाड रस्त्यावर केरकरवाडी येथे चिंचेची भलीमोठी फांदी रस्त्यावर कोसळली. यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवर ही फांदी कोसळली. यावेळी दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले.या जखमीला स्थानिक ग्रामस्थानी फांदी खालून बाहेर काढले. यावेळी स्थानिक डॉ. गणपत टोपले यांनी घटनास्थळी येत जखमीवर उपचार केला. दैव बलवत्तर म्हणून दुचाकी स्वार दादा पालयेकर (गोवा…

Read More

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील कुटुंबांसाठी डस्टबिनचे वाटप…

सरपंच सौ.मिलन पार्सेकर यांच्या हस्ते झाला शुभारंभ… सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील कुटुंबांकरीता सरपंच सौ.मिलन विनायक पार्सेकर यांच्या हस्ते डस्टबिन वाटप शुभारंभ करण्यात आला. स्वच्छतेकडून समृद्धीकडे उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत च्या 15 वित्त आयोगांमधून स्वच्छते करिता ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गावातील कुटुंबांना सुका कचरा व ओला कचरा याकरिता प्रत्येकी एक डस्टबिन…

Read More

टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही…

चालकांचे आंदोलन तूर्तास मागे.. ⚡सिंधुनगरी ता.०२-:आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा देणाऱ्या व बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे समोर आले आहेत. अल्प मानधनावर काम करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकानी वाढीव मानधन व अन्य प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी भावना समोर आंदोलन छेडले. सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या आंदोलनाची तात्काळ…

Read More

गोवा येथील आयुष्मान भारत आयुर्वेदिक रुग्णालयाच्या जवळ एसटी थांबवावी…

नारायण उर्फ बबन राणे यांची मागणी: अन्यथा शिवसेना ‘रास्ता रोको’ करणार.. ⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (MSRTC) धारगळ, गोवा येथील आयुष्मान भारत आयुर्वेदिक रुग्णालयाच्या जवळ एसटी थांबा मंजूर करण्यात यावी अशी मागणी शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी केली आहे. दरम्यान या मागणीची तात्काळ पूर्तता न झाल्यास शिवसेना ‘एसटी रोको’ आंदोलन करेल,…

Read More

शक्तिपीठ महामार्गाला विकासासाठी पाठिंबा द्या,…

अमित परब: विरोधासाठी विरोध करणे टाळावे.. सावंतवाडी, ता. ०२: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तयार करण्यात आलेली संघर्ष समिती म्हणजे ही एक खोडसाळ समिती आहे. त्यामुळे या समितीच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन युवा कार्यकर्ते तसेच चारठा उपसरपंच अमित परब यांनी केले आहे. दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार असल्यामुळे त्याचा फायदा संबंधित शेतकऱ्यांना…

Read More

मत्स्यशेतकरी भाजप प्रदेशाध्यक्ष बनल्याने महाराष्ट्राला नीलक्रांती अनुभवण्यास मिळेल: रविकिरण तोरसकर…

⚡मालवण ता.०२-: आमदार रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने एक मत्स्य शेतकरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाला आहे. मत्स्य शेतीमधील आणि मत्स्य व्यवसायामधील खाचखळगे माहीत असलेला एक दृष्टा नेता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे महाराष्ट्राला नीलक्रांती लवकरच अनुभवण्यास मिळेल, अशी आशा भाजपचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक व नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली…

Read More

स्वच्छ्ता ग्रीन लिफ रेटिंगसाठी हॉटेल, लॉजिंग, न्याहरी निवास यांनी अर्ज करावे…

जिल्हाधिकारी पाटील यांचे आवाहन:पर्यटक वाढीसाठी फायदा होणार असल्याचे केले आश्र्वस्त.. ओरोस ता २जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग अंतर्गत गुणांकण होऊन 1, 3 व 5 लिफ नामांकण देण्यात येणार आहे. या रेंटिंगच्या माध्यमातुन देशी- विदेशी पर्यटक येथिल हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापनेना भेट देतील. त्याचा फायदा जिल्ह्यातिल पर्यटन व्यवसाय…

Read More

वेत्ये गावात लाईटच्या समस्येवर तोडगा…

उद्यापासून दुरुस्तीची कामे सुरू होणार: सरपंच गुणाजी गावडे यांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पावसाळा सुरू झाल्यापासून वेत्ये गावातील वीजपुरवठ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) उपअभियंता कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली. सरपंच श्री. गुणाजी गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपअभियंत्यांशी चर्चा करत गावातील वीज समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले….

Read More
You cannot copy content of this page