ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील कुटुंबांसाठी डस्टबिनचे वाटप…

सरपंच सौ.मिलन पार्सेकर यांच्या हस्ते झाला शुभारंभ…

सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील कुटुंबांकरीता सरपंच सौ.मिलन विनायक पार्सेकर यांच्या हस्ते डस्टबिन वाटप शुभारंभ करण्यात आला.


स्वच्छतेकडून समृद्धीकडे उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत च्या 15 वित्त आयोगांमधून स्वच्छते करिता ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गावातील कुटुंबांना सुका कचरा व ओला कचरा याकरिता प्रत्येकी एक डस्टबिन ग्रामपंचायत कडून वाटप करण्यात येत आहेत. या वाटपाचा शुभारंभ सरपंच सौ.मिलन विनायक पार्सेकर यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालयातील आयोजित विशेष ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी या डस्टबिनचा गावातील ग्रामस्थांनी योग्य वापर करून कचरा उघड्यावर न टाकता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट करून गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. या वाटप प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट, सौ.सानिका शेवडे, सौ.गिरीजा मुळीक,मधुकर जाधव पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,पोलीस पाटील राजाराम मुळीक,तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट, गावातील सीआरपी आशा,अंगणवाडी सेविका व महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष ग्रामसभेचे सचिव म्हणून राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 च्या मुख्याध्यापिका सौ.वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page