सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी नवनाथ झोरे…

⚡मालवण ता.०२-:
सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी नवनाथ लक्ष्मण झोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी नवनाथ झोरे यांना नियुक्तीपत्र यांना दिले आहे.

धनगर समाज राजकीय दृष्ट्या सक्रिय आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सकल धनगर मल्हार सेना ही संस्था कार्यरत असून संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे आहे. नवनाथ झोरे यांचे सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाची नोंद घेऊन त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही काही धनगर वस्त्या अजूनही वीज, रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या मूलभूत सुविधावर लक्ष केंद्रित करून या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार तसेच कुठे तरी धनगर समाजावर अन्याय होत असल्याची भावना असून तालुक्यातील वाड्या वस्त्यामध्ये फिरून तिथल्या समाजाच्या अडचणी समजून घेऊन त्या सरकार समोर मांडणार असे नवनाथ झोरे यांनी नियुक्तीनंतर म्हटले आहे.

You cannot copy content of this page