नव्या कार्यकारिणीकडून उपक्रमांचा शुभारंभ..
⚡मालवण ता.०२-:
लायन्स क्लब मालवणची सन २०२५- २६ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून नूतन अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. १ जुलै यादिवशी असलेल्या डॉक्टर्स डे, कृषी दिन, व चार्टर्ड अकाऊंटंट डे यांचे औचित्य साधून मालवण मधील डॉक्टर्स व कृषी अधिकारी व चार्टर्ड अकाऊंटंट यांचा लायन्स क्लब तर्फे सत्कार कल्पवृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.
डॉक्टर्स डे निमित्त मालवण मधील डॉ. दर्शन खानोलकर (रेडकर हॉस्पिटल), डॉ. यज्ञा तारी (रेडकर हॉस्पिटल), डॉ. संजय पाटील ( दंतचिकित्सक), डॉ. पंकज दिघे (दिघे हॉस्पिटल), डॉ. सचिन दिघे (दिघे हॉस्पिटल), डॉ. अश्विन दिघे (दिघे हॉस्पिटल), डॉ. जुई देसाई ( दंतचिकित्सक), डॉ. शशिकांत झाटये (अंकुर हॉस्पिटल), डॉ. मालविका झाटये (अंकुर हॉस्पिटल), डॉ. अमोल झाटये (अंकुर हॉस्पिटल), डॉ. विणा मेहेंदळे (मसुरे), डॉ. हरिश परुळेकर (बालरोगतज्ञ), डॉ. राजन लांडगे (पशुवैद्यकीय अधिकारी), डॉ. रजत दळवी (पशुवैद्यकीय अधिकारी) यांचा सन्मान करण्यात आला. तर कृषी दिनानिमित्त श्री. दत्तात्रय मस्कर (कृषी अधिकारी), सौ. संजीवनी वाघमारे (कृषी अधिकारी) यांचा तसेच चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) दिनानिमित्त सीए श्री. युगांत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच यानिमित्त मालवणमधील श्री माघी गणेश मंदिर परिसर, नागेश्वर संकुल, बांगीवाडा येथे कल्पवृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब मालवणच्या नूतन अध्यक्ष सौ. अनुष्का चव्हाण, सचिव सौ. मनाली दळवी, खजिनदार सौ. पूनम चव्हाण यांच्यासह मावळते अध्यक्ष महेश अंधारी, लायन्स सदस्य गणेश प्रभुलीकर, विश्वास गावकर, राजा शंकरदास, मुकेश बावकर, शांती पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शालबिद्रे, सहदेव बापार्डेकर, अरविंद ओटवणेकर, रुजारिओ पिंटो, महेश कारेकर, जयश्री हडकर, स्वप्नाली नेरुळकर, गीता आचरेकर, नंदिनी गावकर, दीक्षा गावकर, राधिका मोडकर, सारिका मोडकर, पल्लवी तारी, ऋग्वेदा धामापूरकर आदी उपस्थित होते.