अमित परब: विरोधासाठी विरोध करणे टाळावे..
सावंतवाडी, ता. ०२: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तयार करण्यात आलेली संघर्ष समिती म्हणजे ही एक खोडसाळ समिती आहे. त्यामुळे या समितीच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन युवा कार्यकर्ते तसेच चारठा उपसरपंच अमित परब यांनी केले आहे.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार असल्यामुळे त्याचा फायदा संबंधित शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गासाठी जाणार आहेत, त्यांना योग्य तो मोबदला मिळणार आहे. त्यामुळे विरोधासाठी विरोध करणे टाळावे आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा या प्रकल्पाला सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे परब यांनी सांगितले.