तळेखोल ग्रामपंचायतीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम…
⚡दोडामार्ग ता.२५-: पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेनुसार ग्रामपंचायत तळेखोल यांच्या वतीने नैसर्गिक जलप्रवाहांवर जलसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या एका दिवसात तीन वनराई बंधारे उभारून पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे शक्य झाले आहे.हा उपक्रम सरपंच सौ. वंदना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी उपसरपंच महादेव नाईक, ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, गिरीजा दळवी, सुरेखा शेळके,…
