⚡दोडामार्ग ता.२५-: पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेनुसार ग्रामपंचायत तळेखोल यांच्या वतीने नैसर्गिक जलप्रवाहांवर जलसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. अवघ्या एका दिवसात तीन वनराई बंधारे उभारून पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे शक्य झाले आहे.
हा उपक्रम सरपंच सौ. वंदना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी उपसरपंच महादेव नाईक, ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, गिरीजा दळवी, सुरेखा शेळके, शाम गवस, सिंचल सावंत, उर्मिला गवस उपस्थित होते. कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, सहाय्यक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व उपकृषी अधिकारी ए. एस. कोळी यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. लोकसहभागातून व कमी खर्चात राबविण्यात आलेला हा उपक्रम जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण व भूजल पातळी वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा असून इतर ग्रामपंचायतींसाठीही आदर्श ठरत आहे.
तळेखोल ग्रामपंचायतीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम…
