कणकवली : मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या समृद्ध पंचायतराज महोत्सव या उपक्रमांतर्गत कलमठ गावात विविध स्वच्छता व प्रबोधनात्मक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली. या उपक्रमाचा प्रारंभ कणकवली–आचरा मार्गावरील लक्ष्मी चित्रमंदिर ते कलमठ बाजारपेठ या दरम्यान स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. या मोहिमेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता मोहीम यशस्वी केली.
या महोत्सवांतर्गत २५ ते २९ डिसेंबर दरम्यान स्वच्छ वाडी – स्वच्छ संकुल ही कलमठ गाव मर्यादित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच २६ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन समोर प्रबोधनपर पथनाट्य, २८ डिसेंबर रोजी स्मशानभूमी स्वच्छता, तर २९ डिसेंबर रोजी सार्वजनिक विहीर शुद्धीकरण व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याची शालेय गटासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण व प्रबोधनपर फुगडी स्पर्धा ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कलमठ ग्रामपंचायत येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमांना सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांच्यासह महेश लाड, स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, गुरु वर्देकर, स्वरूप कोरगावकर, आबा कोरगावकर, तेजस लोकरे, विलास गुडेकर, पप्पू कोरगावकर, ओंकार मेस्त्री, दिनार लाड, अक्षता करंजेकर, पूजा हुन्नरे, विभावरी कांबळे, सान्वी कुडाळकर, अक्षता लाड, प्राची पवार, शर्मिला चव्हाण, राजश्री शिर्के, सुनीता पाटकर, सुलभा कदम, रत्नावली लाड, शुभांगी सावंत, रूपेश कदम, मंगेश कदम, आरती गुरव, गणेश सावंत, अण्णा सावंत, ज्योती आमदोसकर, अंकिता राणे, नमिता मठकर, रमेश चव्हाण, मनोज घाडी, गौरव तांबे, मोहन तांबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
