चोरीच्या घटनांमुळे दोडामार्ग व्यापारी संतप्त…

दोषींवर कठोर कारवाई करा:पोलिसांना निवेदन..

⚡दोडामार्ग ता.२५-: तालुका व शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात संताप व्यक्त होत असून, दोडामार्ग व्यापारी संघटनेने पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात नियमित गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करणे व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दुकानफोडी व मालचोरीमुळे असुरक्षिततेची भावना वाढल्याने मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी सागर शिरसाट, संतोष नानचे, वैभव इनामदार, भूषण सावंत, सुदेश मळीक, राजेश सावंत, श्याम चांदेलकर, बंटी मोरजकर, अनिल सांबारी, ओंकार पेडणेकर, फोंडू हडीकर, बाळू गावडे, श्री. मयेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page