दोडामार्ग शिवसेनेची तालुका समन्वय समिती स्थापन…

⚡दोडामार्ग ता.२५-: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवणे व प्रचार–प्रसिद्धी अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी दोडामार्ग शिवसेना तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली तालुका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीत लक्ष्मण आयनोडकर, नगरसेवक चंदन गावकर, विजय जाधव, विनिता घाडी, माजी जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, मदन राणे, मिलिंद नाईक, संदेश राणे यांचा प्रामुख्याने समावेश असून तिन्ही विभागप्रमुखांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे.
तालुका समन्वय समिती उमेदवार निवड, इतर पक्षांशी आघाडी, प्रचार यंत्रणा उभारणी आदी विषयांवर सर्वानुमते निर्णय घेणार आहे. माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करणार असून माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी व सावंतवाडी विधानसभा प्रमुख कालिदास कांदळगावकर यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
येत्या निवडणुकांत पक्षाला यश मिळवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागणार असून सत्ताधारी पक्षांचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे मत तालुका प्रमुख संजय गवस यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page