⚡देवगड ता.२५-: शिरगाव पंचक्रोशी (ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संघाची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता उपोषण करण्यात येणार आहे.
या उपोषणाची माहिती देताना माजी विद्यार्थी रवींद्र भाऊ जोगल यांनी सांगितले की, शासनाने माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संघ स्थापन करण्याबाबत दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रक जारी केले आहे. सदर परिपत्रक शिरगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष दिले असून, त्यासंदर्भात वारंवार तोंडी तसेच लेखी पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
या दुर्लक्षामुळे नाईलाजास्तव आपल्या व माजी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे उपोषण शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव येथे करण्यात येणार आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे शाळा प्रशासनाने तातडीने माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संघ स्थापनेबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणामुळे कोणालाही त्रास झाल्यास किंवा माझ्याकडून काही चूक होत असल्यास त्याबाबत सर्वांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही रवींद्र भाऊ जोगल यांनी सांगितले आहे
माजी विद्यार्थी संघ स्थापनेसाठी शिरगाव हायस्कूलमध्ये उद्या उपोषण…
