Headlines

समिक्षात्मक विचार,आत्मनियंत्रण,चांगल्या सवयी या यशाच्या त्रिसुत्री…

नयोमी साटम :अप्पर पोलीस अधिक्षकांनी दिला यशाचा कानमंत्र..

देवगड : आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर जग विकसित होत असताना नोकरी व्यवसायात आपले अस्तिव टिकविण्यासाठी दूरदृष्टीने विचार करून नाविन्यपूर्ण संशोधनात्मक कौशल्ये आत्मसात करा. समिक्षात्मक विचार, आत्मनियंत्रण आणि चांगल्या सवयी या यशाच्या त्रिसुत्री आहेत असे मार्गदर्शन अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांनी ओंबळ येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपप्रसंगी केले.

शिरगांव येथील पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर १७ ते २३ डिसेबर या कालावधीत ओंबळ येथे पार पडले समारोपप्रसंगी नयोमी साटम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या, श्रमसंस्कार शिबीरातून विद्यार्थ्याची चांगली जडणघडण होऊन व्यक्तिमत्व विकास होतो येथील अनुभव आयुष्यात उपयोगी ठरतात. महाविद्यालयीन शिक्षणानंतरच जिवनाचा खरा प्रवास सुरु होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जगाचा २० वर्षे पुढचा विचार करायला शिकल पाहिजे.अंतिम साध्य ठरविण्यासाठी ध्येयाची दिशा निश्चित करा. नविन सोशल मिडीयावरील कोणत्याही गोष्टी थेट स्विकारू नका तर्कशुद्ध पद्धतीने पडताळणी करा. मोबाईलवरील नोटीफीकेशन रिल्समुळे मेंदूची विचार करण्याची क्षमता वेगाने संपत आहे. मोबाईचे ग्राहक झाल्याने अल्पकालीन सर्व छान वाटत असले तरी आपण भविष्यातील दिर्घकालीन दृष्टीकोन हरवत आहोत. निर्णय घेताना स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चांगल्या सवयी निरंतर टिकतात त्याच आयुष्याच्या ध्येयाला दिशा देतात असे मार्गदर्शन केले
यावेळी व्यासपिठावर शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, ओंबळ सरपंच अरुण पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी प्राध्यापिका कोमल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी सावळे यांनी केले तर आभार अक्षय हिर्लेकर यांनी मानले.

चौकट
बौद्धीक चर्चासत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन

निवासी श्रमसंस्कार शिबिरात जिल्हा समन्वयक वसिम सय्यद, नाटयलेखक डॉ. राजेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश धोपटे, प्राध्यापक राजेंद्र मुंबरकर, सिमा मुंबरकर, कृषी विस्तार अधिकारी बी.एम लांबाडे, उद्योजक आरिक नादाफ, निवृत सरकारी वकील अँड. एन.डी. पाटील आदी मान्यवरांचे मार्गदर्शन केले.

फोटो कॅप्शन
कर्ले महाविद्यालयाच्या निवासी श्रमसंस्कार शिबीराच्या समारोपप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांनी शिबीरार्थीना मार्गवर्शन केले.

You cannot copy content of this page