एक जण किरकोळ जखमी: टेम्पोचं मोठं नुकसान..
⚡सावंतवाडी ता.२५-: कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोचा आंबोली घाटात भीषण अपघात झाला. समोरून अचानक ओव्हरटेक करत एक वाहन आल्याने कारला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजूला बसलेल्या एका व्यक्तीस किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली.
