“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” मानत जनतेच्या सेवेत समर्पित राहणार…

विशाल परब:दोडामार्ग येथील शासकीय रुग्णालयाला विशाल परब फाउंडेशनच्या माध्यमातून व्हील चेअरसह अन्य वैद्यकीय साहित्य प्रदान.. ⚡दोडामार्ग ता.१०-: दोडामार्गमधील ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेमधील अडचणींबद्दल मला पूर्णजाण आहे. तळागाळातील गोरगरीब व्यक्तींना आजारपणात मदतीचा हात देता यावा, याकरिता “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” मानून व्यक्तिगत पातळीवर मला जेवढे काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न…

Read More

तलाठी सुमित घाडीगावकर यांचे जिल्हा परिषद समोर उपोषण सुरु…

सिंधुदुर्गनगरी,ता.१०: आंबोली सजाचे तलाठी सुमित घाडीगावकर यांनी महसूल विभागाच्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषद कार्यालयासमोर सिंधुदुर्ग नगरी येथे उपोषण सुरु केले आहे. महसूल विभागाच्या कारभाराबाबत चौकशी ची मागणी करून आपल्याला न्याय देण्याची मागणीसाठी घाडीगावकर यांनी उपोषण आज सकाळपासून सुरु केले आहे.

Read More

भटवाडी शाळा नंबर सहा येते एक दिवस बळीराजासाठी म्हणजेच बांधावरची शाळा हा उपक्रम साजरा…

मा.नगरसेविका सौ दिपाली दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत.. ⚡सावंतवाडी ता.१०-: कै लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि प शाळा नंबर सहा भटवाडी सावंतवाडी या शाळेने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला भटवाडीतील प्रसिद्ध शेतकरी श्री मोहन गावडे यांच्या शेतात सर्व विद्यार्थी शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासह हा उपक्रम राबविण्यात…

Read More

दुचाकीवरून पडल्याने पाडलोस येथील महिलेचा मृत्यू…!

बांदा/प्रतिनिधीपाडलोस येथे दुचाकीच्या मागे बसलेली महिला भरधाव वेगात रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे नेत असताना रात्री उशिरा त्यांचे वाटेतच निधन झाले. लक्ष्मी नारायण माळकर (वय ६०) रा. पाडलोस असे त्यांचे नाव आहे.हा अपघात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर त्यांना तात्काळ…

Read More

गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांकडे साईंची पालखी दाखल…

⚡सावंतवाडी ता.०९-: गुरूपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येथील प्रती शिर्डीची पालखी दाखल झाली. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी श्री साईची पालखी दाखल होते. केसरकर दांपत्याकडून यावेळी पादुकापुजन केले जाते. बुधवारी सायंकाळी केसरकर यांच्या निवासस्थानी श्री साईंची पालखी दाखल झाली. दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते साईबाबांच्या…

Read More

मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचा दाखवा…

आमदार दीपक केसरकर यांचे विरोधकांना आव्हान:अंगावर आलं तर सोडत नाही. त्यामुळे विनाकारण भानगडीत पडू नका.. ⚡सावंतवाडी ता.०९-: आदित्य ठाकरेंचा तो पोरकटपणा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. दिवसरात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोकं आहेत. मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचा दाखवा असे आव्हान माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिले. तसेच माझी बांधीलकी…

Read More

लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष पदी सौ. अनुष्का चव्हाण…

सचिव पदी मनाली दळवी व खजिनदार पदी पूनम चव्हाण :१३ रोजी शपथविधी पदग्रहण सोहळा.. ⚡मालवण ता.०९-:लायन्स क्लब मालवणची सन २०२५- २०२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळ गठीत करण्यात आले असून क्लबच्या अध्यक्षपदी सौ. अनुष्का चव्हाण यांची निवड झाली आहे. तर सचिव पदी सौ. मनाली दळवी व खजिनदार पदी सौ. पूनम चव्हाण यांची निवड झाली आहे….

Read More

धक्का मित्रमंडळातर्फे गरजू मुलांना शालेय गणवेश वाटप…

⚡मालवण ता.०९-:सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या मालवण मधील धक्का मित्रमंडळ या ग्रुपच्या वतीने मालवण शहरातील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व कन्याशाळा या शाळांमधील गरजू मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. तर फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी धक्कादायक मित्रमंडळाचे सदस्य शंकर पाटकर, संजय गावडे, बाबू डायस, हेमंत शिरगांवकर, देवा तोडणकर,…

Read More

समुद्रात बेपत्ता झालेल्या मच्छिमाराचा मृतदेह दांडी किनाऱ्यावर सापडला…

⚡मालवण ता.०९-:मालवण मेढा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश विजय वाघ या मच्छिमाराचा मृतदेह आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दांडी किनाऱ्यावर दिसून आला. पोलिसांनी दांडी किनारी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णलयात नेण्यात आला आहे. काल मंगळवारी सकाळी मालवण मेढा समोरील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका…

Read More

कास-दाभाळवाडी येथे महावितरणचा अजब कारभार…

वीज वाहिनीच्या विद्युत खांबाला चक्क दोरीचा आधार:स्थानिकांची महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी.. ⚡बांदा ता.०९-: कास-दाभाळवाडी येथे महावितरणचा अजब कारभार समोर आला असून मुख्य वीज वाहिनीच्या विद्युत खांबाला चक्क दोरीचा आधार देऊन बांधण्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिकांनी महावितरणचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य अजय भाईप, माजी…

Read More
You cannot copy content of this page