उपअभियंता अजित पाटील यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा सन्मान पुरस्कार जाहीर…
⚡मालवण ता.१९-:सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणचे उपअभियंता अजित पाटील यांनाही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती/पुलांची…
