Headlines

सिंधुदुर्ग बँकेच्या ७३ पदांच्या भरतीसाठी आता ४ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ…

सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी:आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल, तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेस मध्ये.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 73 लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत होती. आता उद्यापर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली असून उमेदवारांना ४ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत…

Read More

शिक्षक पात्रता संदर्भात सर्व शिक्षक संघटनांचा मूक मोर्चा…

⚡ओरोस ता २९-: शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास 4 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनांचे व्यासपीठ जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयाने कार्यरत सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) सक्ती…

Read More

दसरा मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून ५ हजार शिवसैनिक जाणार…

संजू परब:निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम असून केसरकरांच्या मनातील इच्छा आम्ही पूर्ण करू.. सावंतवाडी : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून ५ हजार शिवसैनिक जाणार आहेत. १ तारीखला सायंकाळी आझाद मैदानावरील होणाऱ्या मेळाव्यास रवाना होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, मतदारसंघातील तालुकाप्रमुख व…

Read More

नवरात्र उत्सवाच्या उत्साहात दांडियाचा रंग…

भाजप पुरस्कृत स्पर्धेला विशाल परब व सौ. वेदिका परब यांची विशेष भेट.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आज MSRT कुंभारटेंब मित्र मंडळ व छत्रपती मित्र मंडळ तुळस यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कृत भव्य दांडिया स्पर्धा येथे भेट दिली. यावेळी मा. सरपंच श्री. विजय रेडकर, सरपंच सौ. रश्मी परब, भाजपा तालुका अध्यक्ष सौ….

Read More

बांद्यात आज डबलबारी भजनांचा जंगी सामना रंगणार…

⚡बांदा ता.२९-: येथील गांधी चौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात यावर्षी भक्तिमय वातावरणात डबलबारी भजनांचा जंगी सामना रंगणार आहे. हा सामना आज सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता गांधी चौक, बांदा येथे पार पडणार असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर दुसरीकडे महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ,…

Read More

न्हावेली येथे दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.२९-: हिंदू सामर्थ्य जागृत करण्यासाठी आणि तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने न्हावेली येथे भव्य दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. २८ सप्टेंबर) संध्याकाळी या दौडची सुरुवात पार्सेकर वाडीतून झाली. माऊली मंदिर, देऊळवाडी, चौकेकरवाडी मार्गे शिस्तबद्ध आणि जल्लोषात ही दौड काढण्यात आली. या वेळी परिसरातील युवक, धारकरी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच…

Read More

परब को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्ण परब यांची तिसऱ्यांदा निवड…

⚡मालवण ता.२८-:परब को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मुंबईची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथील बालविकास व्यायाम मंदिर हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. या सभेत सोसायटीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची सलग तिसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण, उर्फ दीपक परब होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री….

Read More

प्राथमिक शिक्षक गंगाधर कदम यांचे निधन…

⚡कणकवली ता.२८-: अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षक गंगाधर भीमराव कदम (५७, मूळ रा. कांदळगाव व सध्या रा. कणकवली शिवशक्तीनगर) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अत्यवस्थ वाटू लागल्यानंतर गंगाधर यांना सर्वप्रथम कणकवलीतील खाजगी रुग्णालयात व तेथून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा…

Read More

प्राथमिक शिक्षक गंगाधर कदम यांचे निधन…

⚡कणकवली ता.२८-: अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षक गंगाधर भीमराव कदम (५७, मूळ रा. कांदळगाव व सध्या रा. कणकवली शिवशक्तीनगर) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अत्यवस्थ वाटू लागल्यानंतर गंगाधर यांना सर्वप्रथम कणकवलीतील खाजगी रुग्णालयात व तेथून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा…

Read More

कणकवली उपविभागाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची साथ…

⚡कणकवली ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून कणकवली उपविभागासाठी अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाली आहे. ही फिरती डिजिटल फॉरेन्सिक लॅब गुन्हेगारीच्या ठिकाणीच डिजिटल पुरावे त्वरित गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे. या सुविधेमुळे तपास यंत्रणांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढून गुन्हे सोडवण्याचा वेग वाढणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरू करणारे महाराष्ट्र हे…

Read More
You cannot copy content of this page