⚡वेंगुर्ला ता.१९-: माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला,याबद्दल नगराध्यक्ष दिलीप गिरप व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचा
भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष पपु परब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.याप्रसंगी नगरसेवक प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, सदानंद गिरप , नगरसेविका सुषमा खानोलकर, आकांक्षा परब , काजल गिरप, शीतल आंगचेकर, गौरी माईणकर, रिया केरकर , गौरी मराठे व वेंगुर्ला न. प. चे प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषदेचे विशेष कौतुक करताना यापुढेही पुरस्कार मिळवून शहराच्या विकासात भर घालावी, असे सूचित केले. भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी वेंगुर्ला नगरपरिषद आज जे पुरस्कार मिळवीत आहे, ते शहरवासीय नागरिकांसाठी भूषणावह असल्याचे नमूद केले.
वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार…
