सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ येथे संजू परब प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी संजू परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ इतिहास नसून आजच्या पिढीसाठी एक जिवंत प्रेरणास्रोत आहे. शिस्त, परिश्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांनी करावी, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, राजमाता जिजाऊ, तानाजी मालुसरे यांच्यासह विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक वेशभूषांमधून विद्यार्थ्यांनी शिवकालीन इतिहास जिवंतपणे उलगडून दाखवला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थित मान्यवर, शिक्षक व पालकांकडून विशेष दाद मिळाली.

You cannot copy content of this page