सावंतवाडी जिमखाना मैदान येथील लॉन टेनिस ग्राउंडचे अँड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.१९-:
शहरातील क्रीडाप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या लॉन टेनिस ग्राउंडच्या उभारणीसाठी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.या प्रसंगी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर साहेब यांच्या हस्ते विधीवत भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला नगरपरिषदेमधील सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील युवकांना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या लॉन टेनिस ग्राउंडची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे सावंतवाडीतील क्रीडाक्षेत्राला चालना मिळणार असून भविष्यात जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यासही मदत होणार आहे, असा विश्वास यावेळी प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरावडेकर यांनी व्यक्त केले आहे.
सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही यावेळी श्री निरवडेकर यांनी सांगितले

You cannot copy content of this page