कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्यावतीने सरपंच गुणाजी गावडे यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१९-: कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेत वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच गुणाजी गावडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सत्कार समारंभाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गाबित, पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर, नरेंद्र मिठबावकर, बाळू गावडे, गुरुदास गावकर, अरविंद सरसोबत, रेश्मा गावडे, भरत जाधव, उदय गावडे, बिरु कोळेकर, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. आदर्श सरपंच पुरस्कारामुळे वेत्ये गावाचा सन्मान वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page