“स्वराज्य संघटनेचे आयोजन: विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती; युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा..
⚡सावंतवाडी ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, प्रतीक बांदेकर, नगरसेविका सौ सुनीता पेडणेकर, सौ दुलारी रांगणेकर, सौ दिपाली भालेकर, सौ सुकन्या टोपले, भाजपा सोशल मीडिया प्रमुख श्री केतन आजगावकर, दिलीप भालेकर तसेच स्वराज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी शिवभक्त म्हणून उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेले हजारो लाखो शिवभक्त ही महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे, अशी भावना युवा नेते श्री विशालजी परब यांनी यावेळी व्यक्त केली. युवकांची उत्स्फूर्त उपस्थिती हे आजच्या रॅलीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. स्वराज्य संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
