देवगड समुद्रकिनाऱ्यावर आढळला शिर नसलेला मृतदेह…
⚡देवगड ता.१६-: येथील फणसे समुद्रकिनाऱ्यावर शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. नेमका हा मृतदेह कोणाचा? त्याचे शीर कसे काय गायब झाले? यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून अपघात की घातपात? याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात…
