विरनोडकर कथाकथन स्पर्धेत लहान गटात स्वरांग गावडे, मोठ्या गटात गार्गी गुंजाळ प्रथम…

सावंतवाडी : येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या विरनोडकर कथाकथन स्पर्धेत लहान गटात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची कु. स्वरांग गावडे, तर मोठ्या गटात याच प्रशालेची कु. गार्गी गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त थोर कवी, नाटककार व कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीचे औचित्य साधत श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्व. कमलताई विरनोडकर यांनी आपल्या वडिल स्व. गोविंद गणेश विरनोडकर यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या निधीच्या व्याजातून ही स्पर्धा घेण्यात आली.
या कथाकथन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील एकूण ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण सौ. दिशा चं. आकेरकर (ग्रंथपाल, मुक्तद्वार ग्रंथालय) यांनी केले.

स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी

🔹 गट क्र. १ : इयत्ता पहिली ते दुसरी
प्रथम क्रमांक : कु. स्वरांग प्रसाद गावडे
(सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा)

द्वितीय क्रमांक : कु. ओवी प्रसाद आडेलकर
(शारदा विद्यालय, मळगाव)

तृतीय क्रमांक : कु. स्वराली विश्वेश पांगम
(सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा)

🔹 गट क्र. २ : इयत्ता तिसरी ते चौथी
प्रथम क्रमांक : कु. गार्गी रुपेशकुमार गुंजाळ
(सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा)

द्वितीय क्रमांक : कु. सार्थक घनःश्याम बालावलकर (जिल्हा परिषद शाळा नं. ४)

तृतीय क्रमांक : कु. विभा प्रसाद नाईक
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १) यांनी यश संपादन केले.

समारोपप्रसंगी संस्थेचे कार्यवाह श्री. रमेश बोंद्रे यांनी मनोगत व्यक्त करताना, आजच्या पिढीत वाचनाची अभिरुची कमी होत चालली असून मूल्यसंस्कृती हरवत असल्याची खंत व्यक्त केली. ही स्थिती बदलण्यासाठी अशा साहित्यिक व बौद्धिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रसाद पावसकर, सहकार्यवाह श्री. गणेश बोर्डेकर, संचालक श्री. राजेश मोंडकर, सौ. वंदना सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल श्री. महेंद्र पटेल यांनी केले, तर स्पर्धेचे संचालन सहा. ग्रंथपाल सौ. रंजना कानसे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. महेंद्र सावंत व श्री. गुरुप्रसाद वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page