डॉ.श्री.धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..

प्रतिष्ठानच्या वतीने शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान..

⚡सावंतवाडी ता.०१-:
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता.अलिबाग) यांच्या सौजन्याने डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने १ मार्च रोजी संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबविले जाते. याचाच एक भाग म्हणून शिरोडा वेळागर समुद्रकिनारी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर,माजी उपसभापती सिद्धेश परब,नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य योगिता परब, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक,शिरोडा पोलीस दुरक्षेत्र चे प्रसाद कदम, पोलीस पाटील संदीप मोरजकर, आजू अमरे तसेच सिंधुदुर्ग आठ बैठक मधील श्री सदस्य ,उपस्थित होते.

यावेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी या स्वच्छता अभियानचे कौतुक करून खरोखच डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल हे स्वच्छता अभियान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी सुद्धा या स्वच्छता मोहिमेबाबत कौतुक करून हे अभियान स्तुत्य असल्याचे सांगितले. डॉ धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक,शैक्षणिक असे उपक्रम राबविले जात असून त्यांच्या कार्याला आपले नेहमीच सहकार्य असल्याचे सांगितले.

डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यात श्री बैठका घेतल्या जातात यात महिला, पुरुष बैठकांसोबतच बाल बैठकांचा सहभाग असतो.
या आठ बैठकीतील ,शिरोडा,वेंगुर्ला, सावंतवाडी, बांदा,माणगाव, तळवडे, पिंगुळी, ओरोस येथील श्री सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी होत वेळागर समुद्रकिनारी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबविली.
यात शिरोडा वेळागर परिसरातील प्लास्टिक ,काच बॉटल्स,टाकाऊ वस्तु, कपडे, निरुपयोगी पदार्थ,कचरा एकत्रित गोळा करून तो कचरा ग्रामपंचायत शिरोडा येथील कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला .यासाठी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग बैठक श्री सदस्य,शिरोडा ग्रामपंचायत,सामाजिक संस्था, ग्रामस्थ यांनी श्रमदानातून येथील परिसर स्वच्छ केला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे विविध उपक्रम राबविले जातात यात ,रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड व संवर्धन ,स्मशानभूमी स्वच्छता, किल्ले साफसफाई, सार्वजनिक विहिर स्वच्छता, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामीण रुग्णालय परिसरही स्वच्छ करण्यासाठी डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे सहकार्य केले जाते.

त्यांच्या या उपक्रमाबद्दल शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांनी आभार व्यक्त केले असून ग्रामस्थ,पर्यटकांनी देखील येथील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page