Headlines

उबाठा शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेना शाखा येथे करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी वैभव नाईक यांनी केले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले,…

Read Full News

हळवल-भाकरवाडीचा कमी दाबाचा प्रश्न मार्गी…

स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर:पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश,पालकमंत्री नितेश राणे व आमदार प्रमोद जठार यांचे ग्रामस्थांकडून आभार.. ⚡कणकवली ता.०७-: हळवल-भाकरवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. या परिसरासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे ग्रामस्थांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला…

Read Full News

‘यशस्वी जीवनाची दिशा स्वतः ठरवा; आवडीच्या क्षेत्रात कष्ट करा’…

दादा भुसे:मंत्री भुसे यांची बॅ नाथ पै सेंट्रल स्कुलला भेट.. ⚡कुडाळ ता.०७-: शिक्षक ज्ञानदानासोबत विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. मात्र, आयुष्यात कोणत्या दिशेने जायचे, हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्या दिशेने सातत्याने कष्ट केल्यास यशस्वी होता येते, असा संदेश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी विद्यार्थ्यांना…

Read Full News

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा सिंधुदुर्ग दौरा…

कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना भेटी:शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांची केली पाहणी.. ⚡कुडाळ ता.०७-: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेत जाऊया’ या विशेष अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच…

Read Full News

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई व जलताराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०७-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई बंधारा व जलतारा खड्डा खोदून शुभारंभ करण्यात आला.पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी वनराई बंधारे व जलतारा खड्डे मारण्यासाठी शासन स्तरावरून अभियान सुरू करण्यात आली असून गावागावात या अभियानांतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असून याच अनुषंगानेग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई बंधारा व जलतारा खड्डा खोदून शुभारंभ करण्यात आला….

Read Full News

कुंभारमाठ येथील जरीमरी मंदिरात १७ रोजी डबलबारी सामना

मालवण : (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवानिमित्त कुंभारमाठ येथील जरीमरी मंदिरात १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता २०-२० डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. महेश गावकर आणि मित्रमंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भैराई देवी महिला भजन मंडळ, मोंड गावठणवाडीच्या बुवा सौ. स्वराली नाटेकर (पखवाज-हर्षद मेस्त्री, तबला-दियोग भाटकर) व देव केसरकर हनुमान महिला भजन मंडळ, वर्दे…

Read Full News

आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून श्रमदानातून बंधारा पूर्ण…

मालवण, दि प्रतिनिधी आगामी काळात दुष्काळ व संभाव्य पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावू नये, यासाठी आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून गावातील पाणीप्रश्न सुटण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध…

Read Full News

मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर…

*बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा घेणार आढावा.. ⚡सिंधुदुर्ग दि.०७-: मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक कार्यपद्धती तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक पद्धती, मच्छीमारांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी,…

Read Full News

सावंतवाडीतील कथित पाणी गैरव्यवहाराची सखोल चौकशी करा…

‘गॉडफादर’ कोण, हे जनतेसमोर आणा; वायरल व्हिडिओतील आरोपांची तातडीने दखल घ्या, ॲड. समीर वंजारी.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी नगरपालिकेतील कथित पाणी गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची प्रशासनाने तातडीने व निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे ॲड. समीर वंजारी यांनी केली आहे. संबंधित प्रकरणामागे राजकीय संरक्षण किंवा मोठे जाळे…

Read Full News

मंत्री दादा भुसे यांचे सावंतवाडीत नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत…

⚡सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडी शहरात आगमन झाले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मंत्री दादाजी भुसे हे जिल्हा दौऱ्यावर असून, सावंतवाडी येथे त्यांच्या मुक्कामादरम्यान विविध विषयांवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आगमनावेळी भाजप पदाधिकारी व…

Read Full News

You cannot copy content of this page