Headlines

सावंतवाडीत उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

दारूसह मोटारसायकल जप्त; मात्र विक्री करणाऱ्या इसमाने काढला पळ *💫सावंतवाडी-:* ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी शहरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दारू सह मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, दारू विक्री करणाऱ्यांना इसमाने पळ काढला आहे.

Read More

अपर जिल्हाधिकारी कोरोना बाधित जिल्हा प्रशासनात खळबळ

सिंधूदुर्गनगरी ता ३० अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडे ते शासकीय कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. जोशी कोरोना बाधित आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ माजली आहे.

Read More

कुडाळ बसस्थानकासाठी आ.वैभव नाईक यांचा सातत्यपुर्ण पाठपुरावा-ना. अनिल परब

*💫कुडाळ दि.३०-:* कुडाळ गांधीचौक येथील नवीन बसस्थानकाचे आज ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष ना. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. तर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कुडाळ बसस्थानक 1971 पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांपैकी एक असे हे बसस्थानक आहे. कुडाळ शहरातील बसस्थानक अद्ययावत…

Read More

मालवण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी १३९ अर्ज दाखल…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. सहा ग्रामपंचायतीच्या एकूण ५४ जागांसाठी ही निवडणूक होत असून १३९ उमेदवारांनी निवडणूक अर्ज तहसील कार्यालयात सादर केले आहेत. सहा ग्रामपंचायत कार्यालय क्षेत्रातील १० हजार १९४ इतक्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यात ५ हजार २७८ महिला तर ४ हजार ९१६…

Read More

रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयकृत बँकांची उद्या ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रस्तावांबाबत राष्ट्रीयकृत बँकांची आढावा बैठक सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आयोजित कऱण्यात आली आहे. हि बैठक उद्या गुरुवार दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २.०० वाजता ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात…

Read More

मणेरी येथे अपघात,सुदैवाने जीवित हानी नाही

*💫दोडामार्ग दि.३० सुमित दळवी-:* मणेरी बाजारपेठ येथे मोठा अपघात घडला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर वाहनचालक आपल्या ताब्यातील गाडी सुसाट वेगाने सासोली येथून घेऊन येत असताना समोरून येत असलेल्या चार चाकी गाडी वर मोठी धडक दिली. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Read More

सुकळवाड येथील श्री ब्राम्हण देवाचा जत्रोत्सव १ जानेवारी रोजी…

सिंधुदुर्गनगरी ता ३० सुकळवाड येथील श्री ब्राम्हणदेवाचा वार्षिक जत्रोसव १ जानेवारी २०२१ रोजी होत आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह रात्री १० वाजता विविध गटातील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. प्रतिवर्षि प्रमाणे सुकळवाड येथील श्री ब्राम्हणदेवाचा वार्षिक जत्रोसव १ जानेवारी रोजी होत असून या निमित्त सकाळ पासून ओटया भरणे व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

कणकवली नगरपंचायतच्या मंजूर रिक्त पदे भरण्याबाब आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची जिल्हाधिकाऱ्यांजवळ मागणी *💫कणकवली दि.३०-:* कणकवली नगरपंचायतच्या मंजूर असलेल्या स्टाफ पॅटर्न मधील रिक्त पदे भरण्याबाब आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरसेवक व माजी नगरसेवकांनी करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत लक्ष वेधले. नगरपंचायतचे काहीच कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या…

Read More

सरपंच, ग्रामसेवकांसाठीच्या कार्यशाळेत तीन ग्रामपंचायतींचा सन्मान…

*💫वेंगुर्ला दि.३०-:* वेंगुर्ला येथे सुरु असलेल्या सरपंच, ग्रामसेवकांसाठीच्या कार्यशाळेत स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मठ ग्राम पंचायतीचे सरपंच तळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळूसकर, तत्कालीन ग्रामसेवक विवेक वजराटकर, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त वेतोरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण चव्हाण, वेतोरे सरपंच राधिका गावडे यांचा पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी उमा…

Read More

नवीन वर्षापासून दोन दिवस आड पाणी पुरवठा

नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून वापर करावा : वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे आवाहन *💫वेंगुर्ला दि.३०-:* १ जानेवारीपासून वेंगुर्ला शहरातील नळ कनेक्शन धारकांना नगरपरिषदेमार्फत होणारा पाणी पुरवठा दोन दिवस आड करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून व योग्यप्रकारे वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे. निशाण तलावातील अस्तित्वातील पाणी साठा, तलावाचे…

Read More
You cannot copy content of this page