*दिपक केसरकर भाजप मध्ये येण्यासाठी आहेत धडपडत; संजू परब यांचा गोप्यस्फोट

*५ लाख घेऊन स्वाभिमान विकणाऱ्यानी स्वाभिमान वर बोलणे शोभत नाही ;संजू परब यांची रुपेश राऊळ यांच्यावर खरमरीत टीका*

*💫सावंतवाडी दि.१५-:* पालकमंत्री उदय सामंत आणि माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आतापर्यंत किती पक्ष बदलले आहेत. शिवसेनेच्या या नेत्यांना पक्ष बदल्यांचे लायसन्स देण्यात आले आहे का? असा सवाल नगराध्यक्ष संजू परब यांनी रुपेश राऊळ यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला आहे. रुपेश राऊळ हे सेनेच्या खबरा सांगण्यासाठी पे रोलवर होते. निवडणुकीच्या वेळी ५ लाख घेऊन कार्यकर्त्यांना आणून भेटवत होते. त्यांनी विकाऊ स्वाभिमानावर बोलणे योग्य आहे का असा देखील सवाल उपस्थित केला आहे. खासदार आमदार तुमचे असताना तालुक्यात ८ ग्रामपंचायतीवर भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. त्याचे मुख्य कारण आपल्या पदाधिकाऱ्यांनी स्वाभिमान गहाण ठेवल्याने असे देखील ते म्हणाले आहेत. माझ्यावर किंवा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर टीका करण्याची औकात नाही अशी खरमरीत टीका केली आहे. यावेळी दिपक केसरकर हे भाजप मध्ये येण्यासाठी धडपड करत असल्याचा गोप्य स्फोट देखील त्यांनी केला आहे.

You cannot copy content of this page