कारिवडे माडखोल रस्त्यावरील कट्टा पूलासाठी एक कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर…

जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा पाठपुरावा

*💫सावंतवाडी दि.१५-:* तीस वर्षांपासून रखडलेला ऐतिहासिक असे कारिवडे माडखोल रस्त्यावरील मुख्य असे कट्टा पूलासाठी शिवसेने कडून एक कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर गेली बरीच वर्ष लोकांची सतत मागणी असणारे व रखडलेले असे कारिवडे कट्टा पूलासाठी शिवसेनेकडून निधी मंजूर करण्यात आला आहे, हे पूल वावे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा सतत पाठपुरावा करत होते , या कामासाठी माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर, पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायकजी राऊत यांच्या माध्यमातून एक कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर करण्यात करण्यात आला आहे, हे काम मंजूर झाल्याबद्दल कारिवडे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे व जिल्हा परिषदचे मायकल डिसोजा यांचे जाहीर आभार मानले, या कामाचे भूमिपूजन लवकरच माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर विद्यमान पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत व तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून लवकरच होणार आहे

You cannot copy content of this page