*सावंतवाडी स्वच्छता सर्वेक्षण २०२१ स्पर्धेचे निकाल जाहीर

*नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते विजेत्याचा करण्यात आला गौरव; सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा करण्यात आला सन्मान

सावंतवाडी : नगरपरिषद सावंतवाडीच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कोव्हीड काळात प्रशासनाला सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आदींचा ‘स्वच्छता ‌चॅम्पिअन’ म्हणून सन्मान करण्यात आला. नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले आहेत. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करत विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या चित्रकला स्पर्धेतील लहान गटात गणेश बांदेकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक दिव्या जोशी याने पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक अथर्व सावंत याने पटकावला आहे. तर उत्तेजनार्थ क्रमांक अथर्व बागल याने पटकावला आहे. तर मोठ्या गटात आर्य शिरसाट याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक वर्धन आजगावकर याने पटकावला आहे. तर तिसरा क्रमांक नितीन धामापूरकर याने पटकावला आहे. तर उत्तेजनार्थ क्रमांक सानिका गावडे यांनी प्राप्त केला आहे. तर खुल्या गटात धनराज मुंज याने प्रथम तर नेहा आडारकर यांनी द्वितीय तर सुकन्या कुलकर्णी यांनी पटकावला आहे. तसेच या सर्वेक्षणाचे औचित्य साधत घेतलेली जिंगल स्पर्धेत श्रेया सावंत हिने प्रथम तर सिध्दी बोंद्रे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर देविदास बोर्डे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर वासुदेव बांदेकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे. तर शॉट फिल्म स्पर्धेत कलाविष्कार सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अविनाश म्हापणकर यांनी मिळवला असून, तृतीय क्रमांक भक्ती दळवी यांनी मिळवला आहे. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नायब तहसीलदार प्रदीप पवार, नगरसेवक आनंद नेवगी, भारती मोरे, समृद्धी विर्नोडकर, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, पालिकेचे दिपक म्हापसेकर, रसिका नाडकर्णी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page