*💫मालवण दि.१५-:* आचरा स्पोर्ट आयोजित शुटिंग बाॅल स्पर्धेत सातेरी पणदूर संघाने विरण अ संघावर मात करत विजेते पद मिळविले.तर उपविजेता ठरला तो विरण अ संघ . तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते महापूरुष त्रिंबक उत्तेजनार्थ पडेल अ संघाला गौरविण्यात आले. दिवस रात्र खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण बावीस संघांनी सहभाग दर्शविला होता.स्पर्धेचे बक्षिस वितरण बक्षिस दाते अभय भोसले,आचरा माजी सरपंच शशांक मिराशी, जिल्हा शुटिंग बाॅल असोसिएशन चे कार्यवाह सुरेंद्र सकपाळ, डॉ सिद्धेश सकपाळ, मंदार सरजोशी,पंच सागर घाडी,स्पर्धा प्रमुख सुभाष नाटेकर, यांच्या सह आचरा स्पोर्ट चे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
आचरा स्पोर्ट आयोजित शुटिंग बाॅल स्पर्धेत सातेरी पणदूर विजेता…
