Headlines

मळगाव माळीचे घर येथील घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा उद्या…

*💫सावंतवाडी दि.०३सहदेव राऊळ-:* मळगाव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा उद्या गुरुवार ०४ मार्च रोजी कोरोना नियमलवलीचे पालन करून साजरा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रम व भजने होणार आहेत. यानिमित्त सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर रात्री ८ वाजल्यापासून भजने सादर होणार आहेत. यात मुळपुरुष प्रासादिक भजन…

Read Full News

रेल्वेच्या धडकेने अज्ञात युवकाचा मृत्यू…

*💫कणकवली दि.०३-:* कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर जानवली येथे अज्ञात पुरुषाचाचा मृत्यू झाला. 2 मार्च रोजी रात्री साडे अकरा च्या सुमारास ही घटना घडली. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. अंदाजे 40 ते 45 वयाच्या हा इसम असून रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

Read Full News

*_कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर महाशिवरात्रोत्सव गावमर्यादित…._

पुजारी, विश्वस्त, देवस्थानचे कर्मचारी यांनी ऐच्छिक कोवीड टेस्ट करून घ्यावी;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची सुचना *💫देवगड दि.०२-:* श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मार्च २०२० रोजी होणारा महाशिवरात्रौत्सव हा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावमर्यादित होणार असून कोणीही पर्यटक, बाहेरचे भाविक अथवा नागरिक कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येवू नये म्हणून पुर्णत: रस्ते नाकाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच मंदीरात असणारे पुजारी,…

Read Full News

जिलेटीनचा स्फोट शिरंगे येथेच झाला;

आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न – लक्ष्मण नाईक… *💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* रविवारी झालेल्या जिलेटिन स्फोट शिरंगे येथील कॉरीतच झाला असून जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना घटनास्थळावरून सुमारे वीस किलोमीटर लांब मणेरी येथील मुख्य रस्त्यालगत फेकण्याचे दुर्दैवी कृत्य कॉरी मालकाने केले असून झालेला प्रकार उघडकीस न आणता मिटवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर येत आहे, शिरंगे येथील कॉरी…

Read Full News

मानधन न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सिंधूदुर्गनगरी ता २ कोरोना यौद्धा अशी शासनाने बिरुदावली दिलेल्या जिल्हा रुग्णालयातील रेंवीय निदान प्रयोग शाळेतील १३ कर्मचाऱ्यांना गेल्या ४ महिन्यापासून मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मानधन जमा होत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची…

Read Full News

मालवण बस स्थानकाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला…

एसटी प्रशासनाने डोळेझाक केल्याने पुन्हा घडली दुर्घटना *💫मालवण दि०२-:* चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या मालवण बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली असून गेल्या वर्षी पासून या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक वृद्ध प्रवासी जखमी झाला होता. जीर्ण आणि धोकादायक बनलेल्या या इमारतीबाबत एसटी प्रशासनाने डोळेझाक केल्याने आज पुन्हा या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत…

Read Full News

प्रशासन व आंगणे कुटुंबीय यांची संयुक्त बैठक संपन्न….

*५०- ५० च्या समुहाने कोरोनाचे नियम पाळून आंगणे कुटुंबीयांना देवीचे दर्शन;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची माहिती *💫मालवण दि.०२-:* कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची दि. ६ मार्च रोजी होणारी जत्रा ही केवळ आंगणे कुटुंबियांपुरतीच असेल, एका वेळी ५० व्यक्ती अशा पद्धतीने ५०- ५० च्या समूहाने सोशल डिस्टन्ससह कोरोनाचे नियम पाळून आंगणे कुटुंबीय व्यक्तींना देवीचे…

Read Full News

*वेतन न दिल्याने “त्या” कंत्राटी कामगारांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन

मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या तीन चार महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होट आहे. त्यामुळे…

Read Full News

देशातील पहिल्या मँगो टेक प्लॅटफॉर्मचा दिल्लीत शुभारंभ…._!

माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन, ‘ग्लोबल कोकण’चा पुढाकार;GI टॅग हापूस शेतातून थेट घरात पोहचणार, प्रत्येक पेटीवर युनिक क्युआर कोड *💫मालवण दि.०२-:* आपण स्वतः निर्मिती केलेल्या प्रत्येक उत्पादनाला जीआय टॅगचे मानांकन मिळायला हवे. वर्षभर प्रचंड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला प्राप्त व्हावा तसेच कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे संरक्षण आणि बळकटी मिळायला हवी….

Read Full News

*जिल्हावासियांसाठी मोठी खुशखबर…

पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कोरोना लस देणार मोफत *खासदार नारायण राणे स्वतः उचलणार लसीकरणाचा खर्च* *💫ओरोस दि.०२-:* : कोरोना या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात विविध ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासकीय ठिकाणी हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे.तर खासगी रुग्णालयात २५० रुपये भरून हे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री…

Read Full News

You cannot copy content of this page