मळगाव माळीचे घर येथील घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा उद्या…

*💫सावंतवाडी दि.०३सहदेव राऊळ-:* मळगाव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा उद्या गुरुवार ०४ मार्च रोजी कोरोना नियमलवलीचे पालन करून साजरा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रम व भजने होणार आहेत. यानिमित्त सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर रात्री ८ वाजल्यापासून भजने सादर होणार आहेत. यात मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ, वडखोल ता. वेंगुर्ला (बुवा पुरुषोत्तम परब), विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, मळगाव-कुडववाडी (बुवा-दिनेश कुडव), महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगाव-सुतारवाडी (बुवा सिध्देश सावंत), श्री सद्गुरु साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ निरवडे-झरबाजार (बुवा-नरेंद्र बोंद्रे) आदी भजन मंडळांची भजने सादर होणार आहेत. या पुनप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page