बांदेश्वर मंदिर ते शिवाजी चौक डांबरीकरणाचे उद्घाटन…

*💫बांदा दि०३-:* जिल्हा परिषदेच्या नागरी रस्त्याच्या डांबरीकरणाचे सुविधा योजनेंतर्गत बांदा शिवाजी चौक ते बांदेश्वर तिठा दरम्यान ९०० मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ भाजपचे कार्यकर्ते देवानंद कुबल याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सरपंच अक्रम खान, जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, उपसरपंच हर्षद कामत, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, श्यामसुंदर मांजरेकर, अंकिता देसाई, मंगल मयेकर, किशोरी बांदेकर, समिक्षा सावंत, सुनील माजगावकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, अवंती पंडीत, सुनील धामापूरकर, अण्णा पाटकर, प्रसाद बांदेकर, सर्वेश मुळ्ये, गौेरव गवंडे, शिवप्रसाद बांदेकर, श्रीधर सावंत आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page