*_कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर महाशिवरात्रोत्सव गावमर्यादित…._

पुजारी, विश्वस्त, देवस्थानचे कर्मचारी यांनी ऐच्छिक कोवीड टेस्ट करून घ्यावी;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची सुचना

*💫देवगड दि.०२-:* श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मार्च २०२० रोजी होणारा महाशिवरात्रौत्सव हा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावमर्यादित होणार असून कोणीही पर्यटक, बाहेरचे भाविक अथवा नागरिक कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येवू नये म्हणून पुर्णत: रस्ते नाकाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच मंदीरात असणारे पुजारी, विश्वस्त, देवस्थानचे कर्मचारी यांनी ऐच्छिक कोवीड टेस्ट करून घ्यावी अशी सुचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली आहे. या संदर्भात मंगळवारी महत्वाची बैठक व पाहणी कुणकेश्वर येथे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.यावेळी पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारूती कांबळे, स.पो.निरिक्षक संजय कातिवले, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब व कुणकेश्वर देवस्थान टड्ढस्ट अध्यक्ष संजय वाळके आदी पदाधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी केवळ ५० लोक उपस्थित राहून देवस्थानामधील महाशिवरात्री निमित्त होणारे धार्मिक विधी पार पाडणार आहेत. जे विधी पार पाडतील त्यांनी ऐच्छिक कोवीड टेस्ट करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाèयांनी केले आहे.त्याचबरोबर बाहेरील भाविक व इतर नागरिकांनी उपस्थित राहू नये म्हणून नाकाबंदी करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत.सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून यात्रा पार पाडावी अशा सुचनाही जिल्हाधिकाèयांनी दिल्या आहेत.यावरून केवळ धार्मिक विधीसाठी कुणकेश्वर मधील महाशिवरात्रोत्सव होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

You cannot copy content of this page