Headlines

महिलांनी आव्हाने स्वीकारत प्रगती साधावी-: सौ. मेघना जोशी…

*💫मालवण दि.०८-:* आजच्या युगात महिलांसमोर दैनंदिन जीवनात वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. पुरुषांच्या बरोबरीने आणखी प्रगती साधायची असेल तर ही आव्हाने महिलांनी स्वीकारली पाहिजेत. महिलांनी आव्हाने स्वीकारून आपल्या जीवनात नवनवीन बदल घडवीत प्रगती केली पाहिजे असे प्रतिपादन मालवणच्या जय गणेश इंग्लिश स्कुलच्या माजी मुख्याध्यापिका व लेखिका सौ. मेघना जोशी यांनी भंडारी हायस्कुल येथे बोलताना केले….

Read Full News

सई परब हिचा अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून गौरव

*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांची कन्या सई परब हिला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मिलाग्रीस हायस्कूल मध्ये अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून गौरव करण्यात आला आहे.

Read Full News

निगुडेत जागतिक महिला दिन साजरा…

*💫बांदा दि.०८-:* कोरोना काळात गावावर संकट आले असताना ग्रामपंचायतीच्या खांद्याला खांदा लावून आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका हे काम करणारे सर्व अधिकारी महिला होते. त्यांनी कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर या ठिकाणी मात करण्यासाठी ग्रामपंचायतीला आणि गावाला सतत सहकार्य केले, असे प्रतिपादन निगुडे सरपंच समीर गावडे यांनी केले. निगुडे ग्रामपंचायतमध्ये जागतिक…

Read Full News

महावितरण तर्फे महिलांचा सत्कार

अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम *💫कुडाळ दि.०८-:* महावितरण कंपनीद्वारे अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडल कार्यालय यांच्याकडून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रामध्ये, कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता रमेश लोकरे, मुख्य लिपिक निलेश आंबेकर यांनी कुडाळ हायस्कूल येथे भेट देऊन महिला…

Read Full News

महिलांनी दखलपात्र काम करावे

जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन *💫सिंधूदुर्गनगरी दि.०८-:* चूल आणि मूल ही संकल्पना देशातील महिलांनी मोडून काढली आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असल्याचे सांगत महिलांच्या मेहनतीवर शासनाकडून एखादा पुरस्कार जाहीर होईल असे जिल्ह्यातील महिलांनी…

Read Full News

सिंधुदुर्गातून गोव्यात गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांची परवाना तपासणी….

*💫बांदा दि.०८-:* बांदा पोलीस चेकपोस्टवर महसुल विभागाने आज सकाळी अचानकपणे सिंधुदुर्गातून गोव्यात गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांची परवाना तपासणी मोहीम राबविली. मात्र, नेटवर्क प्रॉब्लेममुळे ऑनलाईन मेसेज पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बांदा पोलीसांच्या सहकार्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली.  नेटवर्क प्रॉब्लेमची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला दिल्यानंतर पास स्कॅन करुन वाहने सोडण्याचे निर्देश…

Read Full News

कामगाराचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपींचा जामीन जिल्हा न्यायलयाने फेटाळला

बांदा एका कामगाराचा खून केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला आहे. याकामी सरकारी वकील अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे. ही घटना २२ ऑक्टोंबर २०२० रोजी बांदा सटमटवाडी येथे घडली होती. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असल्याने अटक असलेल्या दोन्ही संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला…

Read Full News

डॉ.दादासाहेबांचा जिवंतपणा साऱ्यांना ऊर्जा देणारा…

कट्टा येथे मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली *💫मालवण दि.०८-:* आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करणाऱ्या डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या निधनामुळे कट्टा पंचक्रोशीतच नव्हे तर या अवघ्या समाज मनात पोकळी निर्माण झाली आहे. ९६ वर्षे आयुष्य जगणाऱ्या डॉ. वराडकरांचे निधन हे प्रत्येकाला आकस्मिक वाटते. निरपेक्ष वृत्तीने वागणाऱ्या सच्चील मनाच्या डॉ दादासाहेबांच्या आपल्यातून निघून जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणारी…

Read Full News

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात महिला सन्मान सप्ताह…

मालवण महिला पोलीस अधिकारी यांचा शाल पुष्पगुच्छ व मास्क देऊन सन्मान *💫मालवण दि.०८-:* महिला दिनाच्या निमित्ताने कुडाळ – मालवण या विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महिला दिनी मालवण पोलीस ठाणे येथे महिला पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा शाल पुष्पगुच्छ व…

Read Full News

पत्रकार विनोद दळवी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार

महिला बचतगटाबाबत उल्लेखनीय लिखाण केल्याने सन्मान सिंधूदुर्गनगरी ता ८ महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘महासमृद्धि महिला सक्षमिकरण अभियान’ कार्यक्रमात राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २०२१ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दै सकाळचे ओरोस प्रतिनिधी विनोद दळवी यांना देवून सन्मानित करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर…

Read Full News

You cannot copy content of this page