बांदा एका कामगाराचा खून केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला आहे. याकामी सरकारी वकील अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे. ही घटना २२ ऑक्टोंबर २०२० रोजी बांदा सटमटवाडी येथे घडली होती. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असल्याने अटक असलेल्या दोन्ही संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
कामगाराचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपींचा जामीन जिल्हा न्यायलयाने फेटाळला
