डॉ.दादासाहेबांचा जिवंतपणा साऱ्यांना ऊर्जा देणारा…

कट्टा येथे मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

*💫मालवण दि.०८-:* आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करणाऱ्या डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या निधनामुळे कट्टा पंचक्रोशीतच नव्हे तर या अवघ्या समाज मनात पोकळी निर्माण झाली आहे. ९६ वर्षे आयुष्य जगणाऱ्या डॉ. वराडकरांचे निधन हे प्रत्येकाला आकस्मिक वाटते. निरपेक्ष वृत्तीने वागणाऱ्या सच्चील मनाच्या डॉ दादासाहेबांच्या आपल्यातून निघून जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणारी नाही डॉ दादासाहेब यांचे असणे हेच साऱ्यांना ऊर्जा देणारे होते डॉ दादासाहेबांनी सुरू केलेले शैक्षणिक कार्य यापुढेही जोमाने करूया तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे विचार कट्टा येथे माजी सभापती आणि भंडारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या निधनाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत अनेक मान्यवरांनी व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली. कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इंग्लिश मिडीयम स्कुल आणि डॉ. दादासाहेब वराडकर आर्टस कॉमर्स महाविद्यालय या तीनही संस्थेच्या वतीने डॉ. चंद्रकांत विठ्ठल तथा दादासाहेब वराडकर यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला कट्टा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सुधीर वराडकर, सुनील नाईक, संजय नाईक, प्रशांत टेंबुलकर, श्याम पावसकर, प्राचार्य मिराशी, मुख्याध्यापक नंदकुमार कांबळे, मुख्याध्यापक हृषीकेश नाईक, बाळकृष्ण गडकरी, मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, योगेश पाटकर, बाळकृष्ण सरमळकर, श्रीधर तांबे, विजय वाईरकर, दीपक भोगटे, नवनीत मिठबावकर, अनिल फणसेकर, अशोक काळे आदी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना दीपक भोगटे यांनी डॉ. वराडकर हे आयुष्यभर गरिबांचे डॉक्टर म्हणून वावरले काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक पदे भूषविली आणि विकासात आपली महत्त्वाची भूमिका बजावली असे सांगितले तर श्री. अजयराज वराडकर यांनी नात्याने जरी दादासाहेब काका असले तरी वडिलांच्या निधनानंतर त्यांनी वडिलांची उणीव भासू दिली नाही आयुष्यभर त्यांनी गरिबांची सेवा केली अनेकांचे संसार उभे केले. त्यांचे आपल्यात असणे हे फार मोठे होते पण नियतीला ते मान्य नव्हते डॉ दादासाहेबांनी सुरू केलेले शैक्षणिक कार्य यापुढेही जोमाने करूया तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे सांगितले. यावेळी विजय वाईरकर, अनिल फणसेकर, नवनीत मिठबावकर, प्रफुल्ल देसाई, बाळकृष्ण गडकरी, अशोल काळे, यांचीही श्रद्धांजली पर भाषणे आली. शेवटी श्री. कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक यांनी केले होते. यावेळी डॉ. दादासाहेब वराडकर यांच्याबद्दल चित्रफितीच्या माध्यमातून माजी मंत्री प्रवीण भोसले, महेश नाईक, वृत्त निवेदक ऋषी देसाई, सर्जेराव कोकाटे, संजय वेतुरेकर, वासंती किणीकर, रवींद्र वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, डॉ. अविनाश झांटये, सदाशिव गावडे, प्रशांत नाईक, मांजरेकर, डॉ. धार पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

You cannot copy content of this page