कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात महिला सन्मान सप्ताह…

मालवण महिला पोलीस अधिकारी यांचा शाल पुष्पगुच्छ व मास्क देऊन सन्मान

*💫मालवण दि.०८-:* महिला दिनाच्या निमित्ताने कुडाळ – मालवण या विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महिला दिनी मालवण पोलीस ठाणे येथे महिला पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा शाल पुष्पगुच्छ व मास्क देऊन सन्मान करून करण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले कुटुंब, काम, कर्तव्य प्रामाणिक पणे बजावत या महिला भगिनी एक स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात यासाठी युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ वतीने आज पासून महिला सन्मान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सन्मान सप्ताहाची सुरवात आज मालवण पोलीस ठाणे येथे करण्यात आली. पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी यांचा मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या सल्लागार ऍड. अमृता अरविंद मोंडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व युवक काँग्रेसच्या विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या हस्ते शाल व गणरायाची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाने महिला पोलीस अधिकारी यांनी देखील आभार मानले. यावेळी मंडळाच्या उपाध्यक्षा नीलम करंगुटकर यांनी कोरोना प्रादुर्भाव होऊ नये याकरिता मास्क वाटप केले. कुडाळ मालवण या विधानसभा क्षेत्रात प्रशासनात तसेच लहान मोठे व्यवसाय – उद्योजक म्हणून ज्या महिला आपल्या कार्यात सक्षम पणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत अशा महिलावर्गाचा या आठवड्यात सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी अरविंद मोंडकर, जिल्हा युवक अध्यक्ष देवानंद लुडबे, श्रीकृष्ण तळवडेकर, नीलम करंगुटकर, सरदार ताजर, अमृत राऊळ, श्रीहरी खवणेकर, योगेश कुर्ले, मालवणकर आदी सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पल्लवी तारी यांनी केले तर सूत्रसंचालन अरविंद मोंडकर यांनी केले.

You cannot copy content of this page