*💫बांदा दि.०८-:* बांदा पोलीस चेकपोस्टवर महसुल विभागाने आज सकाळी अचानकपणे सिंधुदुर्गातून गोव्यात गौण खनिज वाहतुक करणार्या वाहनांची परवाना तपासणी मोहीम राबविली. मात्र, नेटवर्क प्रॉब्लेममुळे ऑनलाईन मेसेज पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बांदा पोलीसांच्या सहकार्याने वाहतुक सुरळीत करण्यात आली.
नेटवर्क प्रॉब्लेमची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला दिल्यानंतर पास स्कॅन करुन वाहने सोडण्याचे निर्देश देण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत ९१ वाहनांची तपासणी करण्यात आल्याचे तपासणी अधिकारी माडखोल तलाठी उत्तम सावंत व बांबर्डे तर्फ कळसुलीचे तलाठी आर. आर. तारी यांनी दिली.
