महावितरण तर्फे महिलांचा सत्कार

अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

*💫कुडाळ दि.०८-:* महावितरण कंपनीद्वारे अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडल कार्यालय यांच्याकडून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रामध्ये, कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता रमेश लोकरे, मुख्य लिपिक निलेश आंबेकर यांनी कुडाळ हायस्कूल येथे भेट देऊन महिला शिक्षिका व विद्यार्थिनीचा यांचा सत्कार केला आहे. यावेळी सौ. पाटील, सौ. आंबेकर, सौ. काजळ गावकर, सौ. सावंत, सौ. कुबल, या महिला शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यालयाचे उपप्राचार्य गुरबे आदी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी माझे विज बिल माझी जबाबदारी या सदराखाली महावितरणची भूमिका स्पष्ट केली आहे.

You cannot copy content of this page